अर्जुन डांगळे यांना एसटी महामंडळ चे अध्यक्ष पद द्यावे.Arjun Dangale should be given the post of Chairman of the ST Corporation.
अर्जुन डांगळे यांना एसटी महामंडळ चे अध्यक्ष पद द्यावे.- Republican Party
2014च्या विधानसभेनंतर शिवसेनेने अर्जुन डांगळे यांना एसटी महामंडळ देऊ असं आश्वासन दिल होते परंतु शिवसेना (पूर्ण ) आणि भाजपने पाळलं नाही तर ते द्यावं आताच्या घडीला एस टी महामंडळाला परवडणार नाही... रिपाई उरण
अर्जुन डांगळे कोण आहेत?
अर्जुन डांगळे रिपाई आठवले गटातून बाहेर पडलेत परंतु आंबेडकर चळवळीतुन बाहेर नाहीत. ते अजून गौतम बुद्धांच्या आणि बाबासाहेबांच्या चळवळीशी एकनिष्ठ आहेत. ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत आणि साहित्यिक, रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत.
साहित्य
- दलित साहित्य : एक अभ्यास
- दलित विद्रोह
- ही बांधारची माणसं
- मैदानातील माणसे
- नवा अजेंडा आंबेडकरी चळवळीचा
- कार्यकारणभाव : समाज आणि साहित्य [७]
- छावणी हालते आहे(कवितसंग्रह
त्यांच्या अनेक कविता, निबंध आणि लघुकथा, समीक्षका प्रकाशित झालेल्या आहेत, तसेच अनेक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये अनुवादित केल्या गेल्या आहेत.
एसटी महामंडळ चे कामकाज कसे चालते?
1.प्रथमतः इतिहास जाणून घेऊयात?
वाहनांद्वारे सावर्जनिक प्रवासी वाहतुकीची सुरुवात महाराष्ट्रात १९३२ च्या सुमारास खासगी व्यावसायिकांद्वारे सुरू झाली. त्यापुढच्या आठ दहा वर्षात या वाहतुकीचे नियमन करण्याची गरज भासू लागली. १९४७ मध्ये भारताच्या ब्रिटिशांची राजवट संपुष्टात आली. स्वतंत्र भारताच्या मुंबई प्रांतात १९४८ मध्ये बॉंबे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉपोर्रेशन (BSRTC) या नावाने प्रवासी वाहतूक करण्यासाठी सरकारी कंपनी स्थापन करण्यात येऊन प्रवाशांच्या सार्वजनिक वाहतुकीचा (पब्लिक ट्रान्सपोर्ट) एकाधिकार या कंपनीला बहाल करण्यात आला.
बीएसआरटीसीची पहिली बस १ जून १९४८ यादिवशी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली. सदरची बस पुणे येथील पहिले चालक तुकाराम पांडुरंग पठारे व वाहक लक्ष्मण केवटे यांनी चालवली. पुढे भाषिक आधारावर राज्य पुनर्रचनेनंतर मुंबई, मध्यप्रांत आणि संपुष्टात आलेल्या निजाम राज्याचा भाग मिळून महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. त्या भागातील वाहतूक सेवा करीत असलेल्या संस्थाही बीएसआरटीसीमध्ये विलीन करून नव्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) या नावाने महामंडळाचा कारभार सुरू राहिला
MSRTC =Maharashtra State Road Transport Corporation
श्री.एकनाथ शिंदे- अध्यक्ष व उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
श्री डाॅ. माधव कुसेकर(भा.प्र.से.) - उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक CEO
श्री. सुधीर श्रीवास्तव - शासकीय संचालक
श्री. यशवंतराव इ. केरुरे - शासकीय संचालक
श्रीमती इराने चेरियान - शासकीय संचालक
श्री. सतीश पुंडलिक दुधे - शासकीय संचालक
डॉ. श्री. प्रवीण गेडाम - शासकीय संचालक
मुख्यालय:महाराष्ट्र वाहतूक भवन, डॉ.आनंदराव नायर मार्ग, मुंबई सेंट्रल, मुंबई – ४०० ००८.
माहिती जाणून घेऊयात?
एसटीची सेवा "गाव तेथे एसटी", "रस्ता तेथे एसटी" या ब्रीदवाक्यानुसार खेड्यापासून शहरापर्यंत विस्तारलेली आहे. महाराष्ट्रात एकूण ३१ विभागातून एसटीचे विभागीय कामकाज होते. त्याचप्रमाणे एसटी महामंडळाकडून आंतरराज्यीय सेवा पुरविली जाते. ह्या सेवेचा गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा व गोवा इ. राज्यांत विस्तार झाला आहे.
मध्यवर्ती कार्यशाळा :
(१) मध्यवर्ती कार्यशाळा, दापोडी, पुणे.
(२) मध्यवर्ती कार्यशाळा, चिकलठाणा, औरंगाबाद.
(३) मध्यवर्ती कार्यशाळा, हिंगणा, नागपूर.
विभागीय कार्यालय : Divisional Office
(१) मुंबई
(२) पुणे
(३) नाशिक
(4) औरंगाबाद
(५) अमरावती
(६) नागपूर
मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था : Training Institute
मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था, भोसरी, पुणे.
एसटी महामंडळात एकूण २२ कर्मचारी संघटना अस्तित्वात आहेत. श्रमिक संघ मान्यता व अनुचित प्रथा प्रतिबंध कायदा १९७१ नुसार एसटी कामगार संघटना या संघटनेला एकमेव मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे आणि कर्मचाऱ्यांचे धोरणात्मक बाबींवर निर्णय घेण्याचा व वेतन करार करताना प्रशासनाशी वाटाघाटी करण्याचा अधिकार या एकाच संघटनेला प्राप्त झालेला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि सुविधा हा कायमच कर्मचारी संघटना आणि महामंडळाचे व्यवस्थापन यांच्यात वादाचा मुद्दा राहिलेला आहे.
हिरकणी बस
Comments
Post a Comment