तरुणांनी नेहमी आपल्यापुढे उदात्त ध्येय ठेवले पाहिजे. तरुणांनी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की कोणतीही चांगली गोष्ट संपादन करण्यासाठी तप करावे लागते
मी एके काळी तरुण होतो तेव्हा माझ्या अनुभवाच्या गोष्टी मी आपणास सांगू इच्छितो,❤️☘️🌿
तरुणांनी नेहमी आपल्यापुढे उदात्त ध्येय ठेवले पाहिजे. तरुणांनी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की कोणतीही चांगली गोष्ट संपादन करण्यासाठी तप करावे लागते. मी अनेक अर्वाचीन तरुण पाहिले आहेत की जे १५ मिनिटे टेबलावर सतत बसू शकत नाहीत.त्यांना घटको घटकी विडी ओढावी लागते,चहा प्यावा लागतो. त्याशिवाय त्यांना कामच करता येत नाही. २४ तासांपैकी २० तास सतत टेबलावर बसून काम करता आले पाहिजे. मी माझ्या विद्यार्थी दशेत येथे व परदेशातही सतत २० तास टेबलावर बसून काम केले आहे. ज्या कोणाला आपल्या बुद्धीचा प्रभाव वाढवायचा आहे त्यांनी तप केले पाहिजे.
दीनदुबळ्या गरीब शेतकऱ्यांना शिक्षण नाही. त्यांच्या अज्ञानाचा फायदा शिकले-सवरलेले शेटजी भटजी वकील वगैरे सर्व लोक घेत आहेत. अशा तऱ्हेने गरीब जनतेस नाडण्याकडेच जर या शिक्षणाचा उपयोग होणार असेल तर धिक्कार असो या शिक्षणाला. त्यादृष्टीने पाहता शिक्षणापेक्षा शील फार महत्त्वाचे आहे.
आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्याच दीनदुबळ्या जनतेच्या उद्धारार्थ न करिता जर शिकून आपली नोकरी भली आहे, आपली बायको मुले भली या भावनेने आजची शिकलेले तरुण वागणार असले तर त्यांचा समाजाला काय उपयोग ? तरुणांनी आज पडलेली जबाबदारी ओळखून त्यांनी त्या कार्यास लागवयास हवे आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर 🇮🇳📓🖋️
जी.आय.पी.रेल्वे तरुण अस्पृश्य परिषद मनमाड १२ फेब्रुवारी १९३८
#महामानव #ambedkar #सही #जयभीम #jaibhim

Comments
Post a Comment