बारक्या कांबळे शौर्यकथा

 लोक शांत झाले. यानंतर बटालियनला ऑगस्ट १९४७ मध्ये दिल्लीला नेण्यात आले, दिल्लीतील जी मुसलमान कुटुंबे पाकिस्तानात जाणार होती; त्यांना आगगाड्यातून सिमेवर सुरक्षितपणे पोहोचविण्याचे काम बटालियनला करावे लागले. २२ आगगाड्यातून २५-३० हजार मुसलमानांना सुरक्षितपणे नेण्याचे अवघड कार्य या जवानांनी केले. या बाबतीत यांना प्राण धोक्यात घालून मुसलमान निर्वासितांचे रक्षण करावे लागले, याबद्दलची दोन उदाहरणे उल्लेखनीय आहेत, ११ सप्टेंबर १९४७ ला दिल्लीहून अत्तारीला, आगगाडी मुसलमान निर्वासीतांना घेऊन चालली होती. महार मिडियमगनची एक तुकडी सुभेदार के. गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली, आगगाडीचे रक्षक म्हणून आगगाडीतील निरनिराळ्या डब्यात बसवली होती. रेल्वे लाईनवर कोणीतरी अपघाताचे कारस्थान अगोदर केल्यामुळे जलंदर शहराच्या नंतर गाडी रूळावरून घसरली तेव्हा आसपासच्या भागातून शेकडो हिंदू व शीख लोक हातांत काठ्या, तलवारी व भाले घेऊन मुसलमान प्रवाशांना मारण्यासाठी धावून आले. सुभेदार गायकवाड यांनी आपल्या सैनिकांना या हल्लेखोरांवर गोळ्या झाडण्याचा हुकूम दिला. सर्व डब्यांतून दोन्ही बाजूनी गोळ्यांचा वर्षाव होत असलेला पाहून हल्लेखोर पळून गेले व दूर उभे राहिले. हे हल्लेखोर परत गाडीवर चाल करतील हे ओळखून सुभेदाराने गार्डाला आगगाडी परत जालंदर शहराला नेण्यास हुकूम दिला. जालंदरच्या स्टेशनावर पुनः दुसऱ्या थव्याने आगगाडीवर हल्ला केला. तेव्हांही सुभेदाराने सैनिकांना गोळीबाराचा आदेश दिला, तेव्हा हल्लेखोरांचा जमाव दूर पळाला व तेथे उभे राहून "आम्ही मुसलमानांना कापणार" अशा घोषणा देऊ लागला. असा हा प्रकार तीन दिवस चालू होता. मुसलमान प्रवासी आगगाडीच्या डब्यात जीव मुठीत घेऊन तीन दिवस अन्न-पाणी व झोप यांच्याशिवाय गप्प बसून राहिले होते. मुले, भूक व तहान यांनी व्याकूळ होऊन रडत होती. सुभेदाराने, स्टेशनपासून दूरच्या ठिकाणी पाणी आणण्यासाठी सैनिकांच्या दोन तुकड्या पाठविल्या. त्यांनी जेव्हां पाणी आणले तेव्हां ते सर्व प्रवांशांना पिण्यास दिले. सुभेदार गायकवाड यांनी प्रसंगावधान व धैर्य दाखवून निर्वासित प्रवासी मुसलमानांचे प्राण वाचविले. चौथ्या दिवशी आगगाडी, रेल्वेलाईन दुरुस्त झाल्यावर जालंदरच्या पुढे निघून इष्ट स्थळी मुसलमान प्रवाशांना पोहचविले. दुसरी गाडी मुसलमान प्रवाशांना घेऊन त्याच मार्गाने चालली होती, त्यावेळी जोराचा मुसळधार पाऊस आला. पावसामुळे जालंदरजवळची रेल्वे लाईन उध्वस्त झाली. सुभेदार के. मोरे यांच्या नेतृत्वाखाली या गाडीचे रक्षण करणेचे काम होते. सुभेदार के. मोरेही गाडीत होतेच. जालंदरला गाडी असलेली पाहून शेकडो हिंदू व शीख हल्ला करण्यास धाऊन आले आणि सांगू लागले "तुम्ही तुमचे सैनिक बाजूला घ्या आम्ही सर्व



मुसलमानांची कत्तल करतो." सुभेदार मोरे उत्तरले की तुम्ही हल्ला केला तर मी माझ्या सैनिकांना तुमच्यावर गोळ्या झाडण्याचा हुकूम देईन व तुम्हां सर्वांना भुईसपाट करीन, सुभेदार मोरे हल्लेखोरांचे व यांचे कडाक्याचे बोलणे १५-२० मिनिटे चालले हल्लेखोर ऐकत नाहीत असे पाहून मोरे यांनी सैनिकांना फायरींगसाठी तयार व्हा असा जोरात ओरडून हुकूम दिला; तेव्हा हल्लेखोर पळून गेले. रेल्वेलाईन दुरुस्त झाल्यानंतर गाडी, ५ दिवसांनी इष्ट स्थळी पोहोचली. या दोन महार लष्करी पथकांच्या नायकांनी आपल्या कर्तव्यावर नितांत निष्ठा ठेऊन हजारो-लाखो मुसलमानांना पाकिस्तानच्या हद्दीवर नेऊन सोडले. (कित्ता पा. ३३-३४)


ता. २७ ऑक्टोबर १९४७ ला पहिल्या बटालियनला हुकूम मिळाला की त्यांनी काश्मिर जम्मू येथे जावे. बटालियनची एक तुकडी काश्मिर व दुसरी जम्मू येथे विमानाने गेली. जम्मूहून ती कंपनी तीन दिवसांनी नौशेरला (वायव्य सरहद्दप्रांत) पाठविण्यात आली. तिसरी कंपनी डिसेंबरला जम्मूला पोहोचली. या बटालियन्स काश्मिर व जम्मू आघाडीवरच्या रणांगणात १८ महिने लढत होत्या. (कित्ता पान. ३४)


पूंच, कोटली, झारंग आणि नौशेरा येथील रणक्षेत्र बर्फाच्छादित उंच हिमालय पर्वतावर होते. या क्षेत्रात महार सैनिकांनी, रात्रंदिवस शत्रूला १८ महिने तोंड देऊन विजयावर विजय मिळविले; आणि काश्मिरच्या रणभूमीवर अभूतपूर्व विक्रम केला की त्याचा नामोल्लेख भारतीय इतिहासात मोठ्या अभिमानाने करावा लागेल.


(35. The part played by the Bn during its 18 months stay in Jammu and Kashmir will go down in the History of KASHMIR operations in general and the Regiment particular. Each coy surpasses the other in the glorious work performed in its respective theatre of operations. More than anybody else the Infantry Bn to which the sections and platoons were attacked remember with affection and gratitude the work MAHARS had done along with them. -The Mahar MG Regiment, page 34).


हवालदार रावू कांबळे आणि नाईक बारक्या कांबळे हे आपली तुकडी घेऊन झांगर या रणक्षेत्रावर ६००० शत्रू सैन्याला सामोरे गेले. त्या ६००० शत्रू सैनिकांना आपल्या तुकडीतील ५० सैनिकानिशी तोंड देत राहिले व त्यांचे इतर सहकारी शत्रूच्या तावडीत सापडू म्हणून शत्रूवर गोळ्यांचा वर्षाव करीत राहिले. या कांबळे द्वयांनी शत्रूला जागचे जागी थोपवून धरले आणि आपल्या सहकारी तुकड्यांना शत्रूच्या जबड्यातून बाहेर पडण्यास भरपूर वाव दिला, त्यावेळी तुकडीतील सर्व सैनिक कामास आलेले होते. आता या दोघा वीरांवर शत्रूने हल्ला चढविला व ते दोघे ज्या इमारतीच्या आश्रयाने गोळ्यांचा वर्षाव करीत होते त्या इमारतीलाच आग लावून दिली. आणि त्या दोघांना पकडून त्यांचा शिरच्छेद केला; त्या दोघांच्या हातांतील मशिनगन्स आपले काम चार-पांच सेकंद करीतच राहिल्या. या दोन वीरांची नांवे बटालियनच्या इतिहासात सुवर्णक्षरांनी लिहिली गेली. डिसेंबर १९४७ च्या काळात कंपनीने जो रणसंग्राम काश्मिरच्या रणभूमीवर केला त्यांत १० सैनिक कामास आले, ६ जखमी झाले आणि १ बेपत्ता झाला.


झांगर येथील संग्रामात जे महार बटालियनचे थोडे बहुत नुकसान झाले होते त्याचा वचपा दुसऱ्या कंपनीने नौशेरच्या ६ फेब्रुवारी १९४८ ला झालेल्या रणसंग्रमात काढला. या लढाईतील तुकडीचे नेतृत्व नाईक कृष्णा सोनवणे आणि पुंडलिकमहार यांचे होते. या दोघानी शौर्याची कमाल केली. त्या दोघांनी


अनुक्रमणिका


सुमारे १००० शत्रूना एका दमात गारद केले. जम्मू व काश्मिर यांच्या रणक्षेत्रात जेवढी शत्रूची संख्या मृत म्हणून गणली गेली; त्यात नौशेरच्या रणक्षेत्रातील हा एक हजार शत्रूना ठार केल्याचा आकडा सर्वांत मोठा होय.


जम्मू आणि काश्मिर येथील समरांगणात पहिल्या महार बटालियन मधील ज्या महार तरुणांनी आपले देह धारतीर्थी ठेवले त्यांच्याबद्दल अनेक जणांनी प्रशंसोद्धार काढलेले आहेत.


('54. The following are the circumstances under which the gallant MAHARS laid down their


extreme devotion to duty.


87


B/s 52


sorte other naik,


4 of 10


<




>


כ

[1/20, 10:44 PM] Blogger: Short history of some other ranks, who lost their lives in J and K operations.


(a) On 24th Dec. 47 No. 4 Platoon, Y cop was occupying the defensive positions in JHANGAR. At about 06.00 hrs.enemy about 200 strong launched an attack on JHANGAR. One MMG subsection commanded by Naik BARKYA KAMBLE was in position inside a building. As the enemy was strong in number and fire power, the infantry on our side started losing ground and were pressedback. But Naik BARKYA KAMBLE with his men stuck to their gun positions undaunted and kept on firing their gun. The enemy had come too close and in the absence of any opposition surrounded the house and set it on fire. The whole subsection lost their fives but refused to surrender. The following were in the brave team:-


1)NK. BARKYA KAMBLE, 2) Sep. YESHWANT KAMBLE, 3) MARUTI SARJE, 4) GURBAL SABLE, 5) TUKARAM KAMBLE, 6) SONYA POWAR, 7) MARUTI TAMBE.


(b) In this very operation Hav. RAAOO KAMBLE, who was commanding another sub-station also lost his life. He had taken the place of No. 1, stuck to his position and kept on firing his gun till his head was chopped off by the enemy.


(c) The following persons who were in the Platoon HQ. also lost their lives in this operation. 1) Sep. SURYAJI HATE, 2) JANU TAMBE, 3) GANGARAM MOHITE, 4) KONDIBA AKHALE and 5) SWBR BAPU LACHMAN.


55. During Dec. 47, 165 Inf. Bde advanced on CHIKOTHI and HAV. SEWAK JADHAV with his section was detailed from the coy, to support 7th Bn. The SIKH Regiment. After capture of CHIKOTHI, he dug a trench and took up the position. The enemy started shelling. The position with his heavy guns and unluckily he was flatly wounded and died. (The Mahar MG Regiment, page 40-41).


पहिल्या महार बटालियनला जम्मू व काश्मिर भागातून हिंदूस्थानांत नेण्याचे मुक्रर करण्यात आले ही बटालियन जम्मू-काश्मिरमधून प्रयाण करण्याचे आदल्या दिवशी मेजर जनरल के. एस. मिथय्या यांनी


अनुक्रमणिका


बटालियनला समारंभपूर्वक निरोप दिला. जम्मू व काश्मिरची रणभूमी अशी पहाडी आहे की तेथे मशिनगन हातात धरणाऱ्या जवानांचीच अत्यंत जरुरी होती. पहिल्या महार बटालियनने हे कार्य चोख केले आणि ते करताना मोठी मर्दूमकी गाजविली आणि महार बटालियनचे नाव अजरामर केले. १७ महिने सतत लढून तुम्ही यश मिळविले. आता तुम्ही भारतात जाऊन विश्रांती घ्या. तुमचे शुभ इच्छितो आणि परमेश्वर तुमचा पाठीराखा होवो एवढीच इच्छा व्यक्त करतो. जय हिंद! अशा अर्थाचे मेजर जनरल थिमय्याचे भाषण महार बटालियनपुढे झाले ते असे-

Comments