उभं आयुष्य चळवळीला
त्यागलेलं व्यक्तिमत्व 💙"मा.मंत्री पँथर गंगाधरजी गाडे साहेब"
#परिवहन_मंत्री
१९९९ साली शरद पवार साहेबांनी काँग्रेस मधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना केली.आणि त्याच काळात गंगाधरजी गाडे साहेबांमुळे मराठवाड्यात रिपाई चळवळ जलद गतीने फोफावत होती.गाडे साहेबांच्या कुशल संघटक वृत्तीचा आणि त्यांच्या जनसंपर्काचा चांगलाच अनुभव शरद पवारांना होता.त्यामुळे गाडे साहेबांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण शरद पवार लवकर करीत.
आदरणीय गंगाधरजी गाडे साहेबांची नेतृत्वाची क्षमता,संघटक वृत्ती,प्रभावी वक्तेपणा आणि समाजहिताच्या भूमिकेला धरून चालणारा नेता आपल्या सोबत असावा अशी तीव्र ईच्छा त्यांच्या मनात होती.या उद्देशाने गाडे साहेबांशी चर्चा करून त्यांना २७ ऑक्टोबर १९९९ साली महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात "परिवहन राज्यमंत्री" म्हणून पद देण्यात आलं.
#मंत्रिपदाला_योग्य_न्याय_देणारा_नेता
"मा.मंत्री पँथर गंगाधरजी गाडे साहेब"
परिवहन राज्यमंत्री म्हणून स्थान मिळाल्यानंतर
रिपाई नेते गंगाधर गाडे यांनी आपल्या मनातील समाजहिताच्या योजना झपाट्याने राबवायला सुरुवात केली.वर्तमानपत्र त्यांच्या कार्याची दखल घेत सातत्याने त्याबद्दल बातम्या छापून आणत.केवळ सहा महिन्याच्या मंत्रीपदाच्या प्रवासात त्यांनी स्वतःची दमदार अशी राजकीय छबी महाराष्ट्रालाच नव्हे तर देशालाही दाखवून दिली.
सहा महिन्यात मागासवर्गीयांच्या १२ हजार जागा त्यांनी भरल्या.मंडल आयोगानुसार बहुजन समाजातील अनेक जातीतल्या मागासवर्गीयांच्या त्यांनी जागा भरून प्रशासकीय कामात एक वेगळं स्थान निर्माण केलं.एवढंच नव्हे तर सभागृहात विरोधकांना जाब देण्याची त्यांची पद्धत मग ते कुठलेही खाते असोत विरोधकांचेही समाधान करणारी असायची.
भरती करतांना गुणवत्तेला बिलकुल नजरेआड न करता पारदर्शकता ठेवण्यात अधिकाऱ्यांना भाग पाडले.आयुष्यभराच्या संघर्षाचा आणि शासकीय कामाचा त्यांना कटू अनुभव असल्या कारणाने नोकरभरती करतांना त्यांनी अतिशय कठोर निर्णय घेतले.
एस.टी चे खाजगीकरण करण्याच्या हालचाली सुरू असतांना त्याला कडाडून विरोध करून एस.टी चे खाजगीकरण रोखले.
गंगाधरजी गाडे साहेब मंत्री होण्याआधी एसटी महामंडळ सातत्याने तोटा सहन करत होतं. परंतु गाडे साहेबांनी त्या मंत्रीपदावर आल्यानंतर स्वतः स्वस्थ न बसता कधीही,कोणत्याही डेपो ला भेट देऊन तिथली स्वच्छता आणि ईतर सर्व गोष्टींची पाहणी करीत.अधिकारी वर्गाला धडकी भरलेली जणू त्या काळात.या सर्व गोष्टींचा परिणाम असा झाला की,
त्या सहा महिन्यांच्या काळात एस.टी चे उत्पन्न ६०० कोटींनी वाढले.त्यांच्या अश्या कामाच्या कौशल्याने प्रचंड लोक त्यांना जोडली गेली अखेर २७ एप्रिल २००० मध्ये गंगाधर गाडे मंत्रिपदाचा कार्यकाळ संपला.
आयुष्यभर जनतेसाठी संघर्ष केलेल्या लढवय्या कार्यकर्त्याला ती सहा महिन्यांची मिळालेली संधी खूप कमी काळाची होती,परंतु त्या संधीचे सोने करून जनतेच्या ओंझळीत टाकण्याची गाडे साहेबांची किमया ही खरंच न्यारी होती.
#२१_नोव्हेंम्बर
#आदरणीय_गंगाधरजी_गाडे_साहेब

Comments
Post a Comment