शेखर लाळे वत्सराज परिवार ब्राह्मण सभा उरण देऊळवाडी युवक मंडळ व देऊळवाडी ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली

 शोकाकुल लाळे व मेडी परिवार आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे शेखर हा माझा लहानपणापासून मित्र होता आपण असं म्हणतो 

की काही गोष्टी आपण भावाला न सांगता मित्राला सांगते त्याचा स्वभाव‌ अतिशय मनमिळावू लोकांना मदत करणारा व 



सगळ्यांना सामावून घेणार होता तसेच तो पंचांग व ज्योतिष शास्त्र यामध्ये त्याचा दांडगा अभ्यास होता तो एन ए डी येथे अधिकारी म्हणून काम करत होता त्याचा स्वभाव व लोकांना मदत करायच्या वृत्तीमुळे एन ए डी चे कर्मचारी व अधिकारी पनवेल येथे स्मशानभूमी मध्ये त्यांची बस घेऊन उपस्थित होते 

माझा मित्र माझा सखा गेल्याने मला मनातून खूप दुःख होत आहे या माझ्या मित्राची पोकळी कधी भरून येऊ शकत नाही मी एवढीच विठ्ठलाला प्रार्थना करतो की या दुःखातून त्याच्या कुटुंबाला उभे राहण्याची शक्ती दे

 व जे काम शेखर करत होता ते काम त्याचा मुलगा मानस यांनी करावे व आपल्या वडिलांचे नावलौकिक सार्थ ठरवावे त्याचे चुलत बंधू वसंता काका रोज म्हणायचा आम्ही जे काम करतो ते शेखर काकाला विचारल्याशिवाय करत नाही वसंता काका व शेखर यांच्यात कमीत कमी 20 ते 22 वर्षाच अंतर होते पण शेखरच्या स्वभावामुळे सर्व कुटुंब त्यांनी एकत्र ठेवले होते गणपती गौरी व अनंताची पूजा आषाढी एकादशी कार्तिकीएकादशी हे सर्व सण तो स्वतः मेहनत घेऊन व आवडीने व आनंदाने करायचा अशा या माझ्या मित्राला वत्सराज परिवार ब्राह्मण सभा उरण देऊळवाडी युवक मंडळ व देऊळवाडी ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली देत आहे शेवटी एवढेच म्हणतो शेखर तू आम्हाला फसवलेस ओम शांती शांती शांती ही🙏🏻🌹🌹


-जयेश वत्सराज उरण नगरपालिका चे कर्मचारी यांचे मनोगत 

Comments