माझ्या पिढीतला,येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देणारा हिरो..
भारतातला पहिला PhD in Sociology Of Education
डॉ. दिगंबर बागुल.
दिगूशी समष्टी आणि फेसबुक मुळे ओळख झाली. पहिल्यांदा भेटलो तेव्हा मस्त गप्पा टप्पा मारणारा अन् मस्ती मजक करणारा पोरगा म्हणून स्वभाव निश्चिती झाली. गप्पांचे रेझोनांस होत गेले की मैत्री दृढ होत जाते तशी ती दृढ होत गेली. दिगंबरचं प्रकांड ज्ञान दिसत गेलं. दिगंबर मूळचा सोनजांब, नाशिकचा. वडील हाडकी हडवळा मधल्या जमिनी वरचे शेतकरी. पांढरं शुभ्र धोतर, सदरा, टोपी हा त्याच्या वडिलांचा तर नीटसं नेसलेलं डोक्यावर पदर घेऊन लुगडं घातलेली आई अशे गावचे गोंडस पालक. गरीबी ही कधीच रोमँटिक नसते. ती हलकटच असते. अश्या हलकट गरिबीतल्या मातीत दिगू तयार झाला. त्याच्या साठी जातीयतेचे चटके फक्त चटके नव्हते.तर खरं खुरं लघवीतून रक्त येईल इतका सो कॉल्ड उच्च वर्णीय लोकांकडून मार खाल्लेला दिगु हा मात्र उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहत होता. TISS चे कॅम्पस फिरताना तिथल्या मेस मध्ये गेल्या वर त्याला दिसलं की इथे सकाळी भर पेट न्याहरी ते जेवणा पर्यंत सर्व सोय होते तर आता इथेच पुढील शिक्षण घ्यायचं त्याने ठरवलं. डोक्याची मेंदूची भूक पुस्तक वाचून जाते. पुस्तक उधर मागून वाचून वापरून परत करता येतं. लायब्ररी मध्ये जाऊन पुस्तकं वाचून मेंदूची भूक भागवता येते पण पोटाच्या भुकेचं सोंग करता येत नाही. वाचनाची भूक भागवायला दीगु खंबीर होताच पण इथे आयती पोटाची सोय होणार म्हटल्यावर दिगू TISS मध्ये पुढील शिकण घेऊ लागला. दरम्यानच्या काळात शिक्षण घ्यावं की गावात जाऊन पारंपरिक द्राक्ष शेती करावी या विवंचनेत तो असायचा पण त्याने शिक्षणाची कास सोडली नाही. शेती आणि शेतकरी प्रश्नांवर मात्र तो अतिशय गंभीर आणि मार्मिक कविता करू लागला. त्याने BA, MA MPhi केलं. TISS कॅम्पसचं राजकारण आणि दिगूचं घट्ट नातं आहे. इतकं की दिगू ने कॅम्पस पॉलिटिक्स सोडून जमना झाला आहे पण पॉलिटिक्स मात्र त्याला सोडायला तयार नाहीये. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील विश्वविद्यालयात पहिल्यांदाच स्टूडेंट असोसिएशनची जनरल सेक्रेटरी ट्रायबल ट्रांस व्यक्ती पण निवडून आली. दिगंबर सोशल जस्टिसचा किती अवढव्या अभ्यासक आहे ह्याची अनुभूती सर्वांना आली. PhD च्या थेसिस मध्ये GOIPMS ( Government Of India's Post Matriculation Scholarship) असा अत्यंत क्लिष्ट पण तितकाच महत्त्वाचा विषय घेऊन त्याने रिसर्च केला. काल त्याचा थेसिस च्या Viva मध्ये सहभागी ऐकण्याची संधी मिळाली. हा थेसिस येत्या काळात तत्वज्ञान, शिक्षण आणि समाजशास्त्र ह्या विषयातला मैलाचा दगड ठरून संदर्भ ग्रंथ होणार हे मात्र निश्चित.
दिगंबरने दिलेली शिक्षणिक सामाजिक झुंज हा मला खडतर प्रवास वगैरे वाटत नाही तर शौर्य गाथा वाटते. लोकशाहीतील शिक्षनिक शौर्य गाथा.
बुद्ध, कबीर, शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, नामदेव ढसाळ, एकनाथ आव्हाड यांनी कणखर केलेल्या विचारांच्या वाटेवर चालणारी शौर्य गाथा.
दिगंबर मिड थर्टीज मध्ये आहे. अजुन अशे असंख्य मेरिट नावाचे मैलाचे दगडं तो पायदळी तुडवत जाणार आहेच. पण ह्या त्याच्या तरुण्यातल्या कामगिरीची प्रेरक नोंद मात्र विद्यार्थि दशे मधले सर्वच घेणारं हे नक्की.
डॉ. दिगंबर बागुल ह्यांना खूप खूप शुभेच्छा.. ❤️

Comments
Post a Comment