खैरलांजी हत्याकांड आणि नॅशनल दलित मुव्हीमेंट फॉर जस्टीस

 खैरलांजीत भोतमांगे यांची काही वर्षापर्यंत झोपड़ी होती आता तिही उध्वस्त झाली असून त्याठिकानी गवत वाढले आहे.

या गावात एकमेव लोखंडी पलंग 29 सप्टेंबर 2006 च्या रात्री घडलेल्या हत्याकांडाचा थरार नाट्याचा साक्षीदार आहे.

मी स्वतः (वैभव तानाजी गिते) जेव्हा दुसऱ्यांदा खैरलांजी गावात 11 सप्टेंबर 2012 साली भैय्यालाल भोतमांगे यांना भंडाऱ्याहुन घेऊन खैरलांजी गावात गेलो होतो तेव्हा भैय्यालाल भोतमांगे यांना विचारले तुमचे घर कुठे आहे.तेव्हा भैय्यालाल भोतमांगे यांनी लोखंडी खाट (पलंग) शेजारी गवत उगवलेले दाखवले.जातीय वाद्यांनी घराच्या वीटा,पत्रा,आणि लाकडं सुद्धा चोरुन नेली होती.मनात काहुर माजल होत. अनेक प्रश्न आणि जातीय वाद्यांची चिड आली होती.वेगवेगळे विचार येऊ लागले.मी भैय्यालाल भोतमांगे यांचे डोळ्यात आलेले अश्रु पूसले आणि भोतमांगे परिवाराच्या पुनर्वसनासाठी नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस के राज्य महासचिव डॉ.केवलजी ऊके यांच्या मार्गदर्शनात शासनाकडे पाठपुरावा केला.आणि घर,नोकरी,आणि शेतजमीन मिळवून दिली.खैरलांजी घडली त्यावेळी माझे वय 20 वर्ष होते. भोतमांगे परिवाराला घटना घडल्यापासून ते आरोपींना शिक्षा लागेपर्यंत मदत करणारे एकमेव संघटना नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस NDMJ ही आहे.

20 जानेवारी 2017 रोजी भैय्यालाल भोतमांगे यांचाही हृदयविकारच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

खैरलांजी गावात भोतमांगे परिवारातील कुणीही राहत नाही. गावात राहन्यासाठी कुणी जीवंत देखील नाही फक्त हा लोखंडी पलंग,खाट आजही गावात जशीच्या तशी आहे.तब्बल दीड दशकानंन्तर सुद्धा खैरलांजी हत्याकांडाची धग जशीच्या तशी आहे..,!!

#khairlanji #खैरलांजी #हत्याकांड 

वैभव तानाजी गिते

राज्य सचिव

नॅशनल दलित मुव्हमेंट फ़ॉर जस्टिस

8484849480



Comments