पुण्यात तीन सामाजिक कार्यकर्त्या तरुणींवर पोलिसांकडून अन्याय
– वंचित बहुजन आघाडीचे पोलिस आयुक्त कार्यालयात ठिय्या !
वंचित बहुजन आघाडीचे यूवा नेते सुजात आंबेडकर यांनी पीडितांशी संवाद साधला
पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात, एका पीडित महिलेला मदत केल्याच्या कारणावरून तीन सामाजिक कार्यकर्त्या तरुणींना बेकायदेशीररित्या ताब्यात घेण्यात आले व त्यांच्यावर जातिवाचक शिवीगाळ, अश्लील भाषेचा वापर आणि शारीरिक मारहाण करण्यात आली.
ही धक्कादायक घटना समजताच वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष ॲड. अरविंद तायडे पुणे शहर, अध्यक्ष युवा आघाडी सागर भाऊ अल्हाट, पुढे शहर महिला आघाडी अध्यक्ष अनिता ताई चव्हाण माथाडी चे अध्यक्ष विशाल भाऊ कसबे व अजय भाऊ भालशंकर चारही विंग चे अध्यक्ष व महासचिव सर्व जबाबदार पदाधिकारी आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी त्वरित पीडित तरुणींना सोबत घेऊन पोलीस आयुक्तालय पुणे येथे धडक दिली आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरोधात अट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी देखील पीडित तरुणींशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि प्रत्यक्षात अंजली ताई आंबेडकर आणि सुजात दादा आंबेडकर यांनी भेट देऊनआणि वंचित बहुजन आघाडी त्यांच्या सोबत ठामपणे उभे असल्याचा विश्वास दिला.
गुन्हेगार पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
![]() |
| युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पहाटे 3.15 वाजता अखेर न्यायाची एक पायरी चढली, लढा सुरू राहिल..! लढेंगे और जितेंगे भी.. |
युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली
पहाटे 3.15 वाजता अखेर न्यायाची एक पायरी चढली,
लढा सुरू राहिल..!
लढेंगे और जितेंगे भी..



Comments
Post a Comment