सरकारचा मीडिया मॅनेप्युलेट करण्याचा प्रयत्न?
देवेंद्र फडणवीस सर्व मीडिया हाऊसला भेट देऊन आले. गणेश दर्शनाचे कारण असले तरी मीडिया हाऊसला त्यांनी काय सूचना दिल्या त्यांनाच माहित.
परंतु त्यांनी भेटी दिल्यानंतर अचानक आंदोलनाबद्दल नकारात्मक बातम्या सुरु झाल्या.
- मराठ्यांकडून हाकेवर भ्याड हल्ला
- मराठा आंदोलकांकडून महिला पत्रकारासोबत गैरवर्तन
- आंदोलकांकडून मुंबईकरांना त्रास
- आंदोलकांकडून हुल्लडबाजी
अशा बातम्या सुरु झाल्या.
सध्या मुंबई व राज्यात मराठ्यांबद्दल सहानुभूतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याला छेद देण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु आहे. सरकार खेळी करीत राहणार.
- आपण सोशल मीडियावर सक्रिय राहून त्याचा आंदोलनासाठी यथायोग्य वापर करा
- आंदोलकांनी शिस्त पाळा
- भेटायला येणारे नेते कोणत्याही पक्षाचे असोत त्यांना त्रास देऊ नका
- आपण येणाऱ्या नेत्यांना त्रास दिला तर घाबरून एकही नेता आपल्याकडे फिरकणार नाही
- पत्रकारांना त्रास देऊ नका
- पोलिसांशी हुज्जत घालू नका
- जरांगे पाटलांना शेवटपर्यंत साथ द्या
- मुंबईकरांना त्रास होईल असे वागू नका
- कुठलीही कृती करताना मनोजदादांना हे अपेक्षित आहे का? याचा विचार करा
- आंदोलनात कोणी अपप्रकार करण्याचा प्रयत्न केला तर जागीच रोखा
- जातीची मान खाली जाणार नाही याची काळजी घ्या
पाटलांनी आपल्यासाठी जीव पणाला आहे. आपण शेकडो किलोमीटर दूर आलो आहोत. गावाकडील बांधव आपण आरक्षण घेऊन येऊ या आशेने बसले आहेत. त्यांचा हिरमोड करू नका.
आजवरचा अनुभव आहे, हे नीच सरकार कोणत्याही थराला जाऊ शकते. आपण स्वयंशिस्त पाळा, जबाबदारीने वागा.
महत्त्वाचे संदेश सर्व आंदोलकांपर्यंत पाठवा 🙏
#mumbai #maratha #marathaarakshan #marathareservation #मराठाआंदोलन

Comments
Post a Comment