कान्हेरी बौद्ध लेणी म्हणजे केवळ लेणी नाही तर ते एक जागतिक दर्जाचे विद्यापीठ होते आणि हे वारंवार आम्ही सांगत आलोच आहे.
कान्हेरी लेणी मधील झालेल्या उत्खननात अनेक पुरावे समोर आले आहेत. यामध्ये E W West ह्यांनी पहिल्यांदा 1860 साली कान्हेरी लेणीमधील 60 शिलालेख प्रकाशित केले होते. त्यांनी केलेल्या महत्वाच्या उत्खननात त्यांना लेणी क्रमांक 13 मधे विशेष वस्तू सापडल्या त्यात एकूण 21 मातीच्या सील होत्या त्यातील कान्हेरी लेणीची ही सील जी आपण फोटो मध्ये पाहतोय.
कान्हेरी लेणी मधील ह्या सील व्यवस्थित अभ्यासणे आवश्यक ठरते कारण यावरून तुम्हाला कान्हेरी लेणीची व्याप्ती लक्षात येईल. आम्ही नेहमीच म्हणत आलोय की बौद्ध लेण्यांचा इतिहास हा आजवर न समजलेला इतिहास आहे. आम्हाला बौद्ध लेण्यांचा इतिहास अभ्यासाने आवश्यक आहे. केवळ धार्मिक इतिहास नसुन ह्या लेण्यांना खूप मोठा आर्थिक इतिहास देखील आहे. समाजाची अर्थव्यवस्था सांगणारा हा इतिहास आम्हाला समजून घेणे खूपच गरजेचे आहे. कान्हेरी लेणी मधील विविध प्रकारचे 21 सील प्राप्त झालेले आहेत त्यावरून कान्हेरी लेणीचे महत्व समजून येते.
आज आम्हाला बौद्ध संस्कृतीचे सर्वात जास्त अध्ययन करण्याची गरज आहे. जितका वेळ आम्ही हिंदू धर्मीय लोकांच्या साहित्याचा अभ्यास करण्यात वेळ घालवतोय तितका जास्त वेळ आम्ही बौद्ध संस्कृतीचे उत्खनन करणे आवश्यक आहे. त्यामुळे आम्हाला आमचा खरा इतिहास समोर घेऊन येता येईल. यासाठी प्रशिक्षित माणसे घडणे आवश्यक आहेत. या देशात कोणती ही संस्कृती अशीच मोठी होत नाही त्यासाठी काम करणारी माणसे लागतात.
![]() |
कान्हेरी |
समाज घडला पाहिजे यासाठी इतिहासातून बऱ्याच गोष्टींना पुढे घेऊन येण्याची गरज आहे . यासाठी समविचारी लोकांचे एकत्रित येऊन काम करणे आवश्यक असते. भारतीय बौद्ध महासभा हा बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संस्थेतून बौद्ध संस्कृतीच्या उत्खननाच्या कामाला सुरुवात झालेली आहे आपण त्यात सामील होणे आवश्यक आहे.
साभार मनोहर
Comments
Post a Comment